
नगराध्यक्षांनी घेतली वैद्यकीय अधिकार्यांची हजेरी
रत्नागिरी शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी स्वच्छतेबाबत वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणण्याचे धोरण स्विकारले आहे. यासाठी कोरोना कुठेही पसरू नये म्हणून तुम्ही ड्युटीच्या कालावधीमध्ये तीन तास झोपडपट्टीत जावून तपासणी करा व त्याचा अहवाल मला द्या. त्यासाठी लागणारे वाहन नगर परिषदेस पुरवेल असे सांगितले असता ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत नेमणुकीला असलेले वैद्यकीय डॉ. पवार यांनी आम्हाला तसे आदेश आरोग्य विभागाकडून येवू दे मग आम्ही विचार करू असे नगराध्यक्षांना सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या नगराध्यक्षांनी या वैद्यकीय अधिकार्यांची हजेरी घेतली. तुम्हाला काम करायचे असेल तर लेखी द्या नाहीतर घरी जा असे सांगितले. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्यांनी तुम्ही आम्हाला असे बोलणे योग्य नाही असे नगराध्यक्षांना म्हणताच नगराध्यक्षांनी तुम्ही सांगूनही थेट नाही म्हणून सांगता हे योग्य आहे का? असा उलटा सवाल केला. तुम्हाला जर आदेश पाळायचे नसेल तर लेखी द्या, आपणही जिल्हा आरोग्य अधिकारी व सभापती यांच्याकडे याबाबत माहिती देवू शकतो असे सांगून त्या अधिकार्यांची हजेरी घेतली.
www.konkantoday.com