
विकलेल्या गाडीचे पैसे मालकाला न देता खडपोली येथील वाहन मालकाची ५ लाख ६० हजारांची आर्थिक फसवणूक
विकलेल्या गाडीचे पैसे वाहन मालकाला न देता व कर्ज खात्यात न भरता एका व्यक्तीने ५ लाख ६० हजारांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना २ ते १५ मार्च २०२४ दरम्यान शहरातील काविळतळी येथील मॅक्स शाईन शोरूम येथे घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतन दत्तात्रय कांबळे (काविळतळी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. तर या घटनेची फिर्याद सुयोग राजाराम कदम (खडपोली, ता. चिपळूण) यानी दिली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुयोग कदम यांच्या मालकीची चारचाकी गाडी (एमएच ०८ एएक्स १०६१) केतन कांबळे याने ६ लाख ५० हार रुपयांना विकली. त्यातील ९० हजार रुपये त्याने कदम यांना ऑनलाईन पद्धतीने वर्ग केले. व उर्वरित रक्कम ६० हजार रुपये रोख देणे आणि ५ लाख रुपये वाहन खरेदी करताना काढण्यात आलेल्या वाहन कर्ज बँक खात्यात जमा करणे असे ठरले होते. मात्र ते पैसे केतन कांबळे यांनी कदम यांना दिले नाहीत. तसेच कर्ज खात्यातही जमा न करता ५ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. तसेच त्यांची गाडीदेखील परत न करता कदम यांचा विश्वासघात करून अपहार केल्याचेही त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात केतन कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.www.konkantoday.com