संजय राऊत यांना अटक करण्याची नारायण राणे यांची मागणी.
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने ‘जोडो मारो’ आंदोलन केले. या आंदोलनावरून खासदारा नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर राजकारण करत असल्याची टीका करत संजय राऊतांवर गंभीर आरोप करत अटक करण्याची मागणी केली.संजय राऊतला निवडणुकीसाठी दंगल घडवायच्या आहेत. सत्तेत येण्यासाठी त्यांना दंगली करायच्या आहेत, राज्य सरकारने ताबडतोब त्याला अटक करावी, असे नारायण राणे म्हणाले.