
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दोन आरोपी अटक.
रविवार 8 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेऊन आरोपींना गजाआड केले नाही तर चिपळूण पोलीस स्थानकावर मोर्चा काढणार असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर पोलिसांनी 12 तासातच अण्णा जाधवांवरील हल्ल्यातील मुख्य सुत्रधारासह दोघांना ताब्यात घेतले.विधानसभेच्या ऐन निवडणूकीच्या धामधुमीत वंचित आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर तीन अज्ञात तरूणांनी प्राणघातक हल्ला केला होता.
या हळल्यानंतर पोलिसांनी रविवारीच बदलापूर व अंबरनाथ येथून दोघांना अटक केली आहे. या हल्ल्यामध्ये आणखी पाच आरोपी सक्रीय असल्याचे पुढे येत असून गुहागर पोलिसांकडून तपास सुरू आहे. अनुप नारायण जाधव, ( नारायण पॅलेस, राऊत चाळ जवळ, बॅरेज रोड बदलापूर पश्चिम) , कुणाल किसन जुगे (रहाणार घर नं. ४४४५, अण्णा पाटील नगर, शिवानंद मठ शेजारी, अंबरनाथ पश्चिम) असे अटक करण्यात आलेल्या दोन संशयित आरोपींची नावे आहेत.