
स्वरूपानंद पत संस्थेने ९९.५३% वसुली ७ कोटींचा निव्वळ नफा आणि २८% भांडवल पर्याप्तता प्रमाण राखत नोंदवली दमदार कामगिरी – अँड. दीपक पटवर्धन
प्रतिवर्षी वर्षअखेरीच्या दिवशी आपली आर्थिक आकडेवारी घोषित करण्याचा स्वरूपानंद पतसंस्थेचा शिरस्ता आहे. त्याला अनुसरून संस्थेची सातत्यपूर्ण वृद्धिंगत होणारी आकडेवारी जाहिर करताना खूप अभिमान वाटतो कारण प्रतिवर्षी प्रमाणेच या वर्ष अखेरीला संस्थेने सातत्यपूर्ण आर्थिक वृद्धी केली असून २८ % इतके विक्रमी भांडवल पर्याप्तता(CRAR) प्रमाण राखले आहे. ९९.५३% एवढी विक्रमी वसुली आणि ७ कोटींचा निव्वळ नफा ०% नेट NPA राखत ९ शाखांची वसुली १००% करण्यात यश संपादन केले आहे. संस्थेचा ग्रॉस एनपीए ही ०.८३% इतका नगण्य ठेवण्यात संस्था यशस्वी झाली आहे. ठेवसंकलन , कर्जवितरण वाढलेगत वर्षीच्या तुलनेत सन २४ अखेर संस्थेच्या ठेवीत १६.५०% वाढ होऊन संस्थेच्या ठेवी ३०८ कोटी ८० लाख झाल्या आहेत. तर कर्जवितरणात १८.१८% ची वाढ झाली असून येणे कर्जे २१५ कोटी ११ लाख झाली आहेत. संस्थेच्या गुंतवणूका १४५ कोटींच्या झाल्या असून संस्थेचे खेळते भांडवल ३७० कोटी झाले आहे. लक्षणीय स्वनिधीसंस्थेचा स्वनिधी ४३ कोटींचा झाला असून संस्थेची मजबूत आर्थिक ताकद दर्शक निधी म्हणून या कडे पाहिले जाते.स्वरूपानंदचा संमिश्र व्यवसाय ही ५२३ कोटी झाला आहे. संस्थेची गंगाजळी १३ कोटी ४५ लाख असून इमारत निधी २१ कोटींचा आहे. आर्थिक समतोल आणि कार्यक्षम व्यवस्थापनस्वरूपानंद ने आपल्या व्यवहारात सातत्य राखले आहे. सर्व व्यवहार, धोरणे योजनाबद्ध पद्धतीने राबवली आहेत. व्यवस्थापन खर्चाचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण १.७५% असे पूर्ण नियंत्रणात राखले असून खेळत्या भांडवलाशी नफ्याचे प्रमाण १.९०% असे लक्षणीय आहे. आपले खर्च पूर्ण नियंत्रांत ठेवत संस्थेने ठेवीवरील व्याज अदा करण्यासाठी १९ कोटी ५४ लाख खर्च केले असून वेतनावर ३ कोटी १५ लाख तर एजंट कमिशन पोटी पिग्मी एजंटना ५९ लाख ५६ हजार खर्च केले आहेत.तर कर्जावरील व्याजापोटी २३ कोटी २० लाख उत्पन्न प्राप्त केले असून गुंतवणुकांवर ९ कोटी ०३ लाख प्राप्त केले असून १ कोटी इतर उत्पन्न प्राप्त केले आहे. या सर्व व्यवहारातून ७ कोटी ३ लाख इतका निव्वळ नफा प्राप्त झाला आहे. संस्थेने आपले सर्व निधी योग्यपद्धतीने व्यवहारात फिरते ठेवल्याने योजनाबद्ध व्यवहार केल्याने उत्तम नफा संस्थेला प्राप्त झाला आहे. वाढता सहभागकेवळ ३०० सभासदांनी स्थापन केलेल्या संस्थेची सभासद संख्या ४४ हजार ८८९ इतकी विशाल झाली असून ४४ हजार पेक्षा जास्त सभासदांच्या भक्कम पाठिंब्यावर स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थविश्व खंबीर पणे मार्गक्रमण करत आहे. २०,७४६ कर्जदार, १९,५०० ठेव खाती अशी ढोबळ मानाने आकडेवारी आहे. पतसंस्थांना CRAR प्रमाण सहकार खात्याने लागू केले किमान ९% प्रमाण ठेवणे अनिवार्य असताना. संस्थेचा CRAR तब्बल २८% इतका लक्षणीय असून संस्थेची आर्थिक भक्कम स्थिती या माध्यमातून दिसून येते.सर्व सभासदांनी उत्तम सहकार्य केले. कर्जदारांनी कर्जाची नियमित परतफेड केली. ठेवीदारानी वेळोवेळी ठेवी ठेऊन आपला सहभाग नोंदवला आहे.एक विश्वासार्ह संस्था म्हणून प्राप्त केलेला लौकिक संस्थेने अबाधित राखला याचे समाधान लाख मोलाचे आहे.नवीन आर्थिक वर्षात ४०० कोटी ठेवी आणि ३०० कोटींच कर्जवितरण आणि नव्या ५ शाखा असा संस्थेचा प्लॅन असून नवीन आर्थिक वर्षात अधिक द्रुतगतीने पुढे जाण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अँड.दीपक पटवर्धन यांनी दिली .www.konkantoday.com