उबाठा माजी पंचायत समिती सभापती यांचा निषेध गैरसमजातून – कोंडगाव व्यापारी मंडळ अध्यक्ष यांचा खुलासा, आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांचे मानले आभार.
मागील काही दिवसापासून कोंडगाव बाजारपेठ येथील मुख्य रस्त्याला खड्डे पडले होते. त्यामुळे गणपती सणाच्या पूर्वी खड्डे भरणे गरजेचे होते. त्यामुळे येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होऊ नयेत यासाठी माजी पंचायत समिती सभापती यांनी जिल्हाप्रमुख विलास चाळके,आमदार राजन साळवी यांच्या माध्यमातून लवकरात लवकर खड्डे भरावी अशी मागणी केली. मागील आठवडा पाऊस असल्याने कामाला अडथळा येत होता.आमदार राजन साळवी यांनी कोंडगाव ग्रामपंचायतिच्या आढावा बैठकीत गणेशोत्सवपूर्वी खड्डे भरून होतील असे सांगितले. त्याचबरोबर दिवाळीनंतर उर्वरित रस्ता सिमेंट काँक्रीटचा होण्यासाठी निधी देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आज प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. मात्र साखरपा गावातील एका माजी सरपंचाने राजकीय स्टंट करण्याच्या उद्देशाने हंगामा केला. त्याचबरोबर व्यापारी मंडळाच्या सदस्यांना चुकीची माहिती देत गैरसमज केला. यामुळे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या उबाठा सेनेचे माजी सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बापू शिंदे यांनी व्यापारी मंडळ अध्यक्षाना सत्य परिस्थिती सांगितली. तत्यामुळे त्यांनी आपला खुलासा देत आमदार राजन साळवी व जिल्हाप्रमुख विलास चाळके यांचे आभार मानले.