
महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार कमी नाहीत, अहवालावरून स्पष्ट.
राज्यात सध्या बदलापूर प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. बदलापूरमधील एका शाळेत सफाई कामगाराकडून चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती.त्यानंतर देखील अनेक महिला अत्याचाराचे प्रकरणं समोर आले, यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता महिला अत्याचारांची आकडेवारी सांगणार NCRB चा एक अहवाल समोर आला आहे.राज्यात महिला अत्याचाराच्या घटनावरून राजकरण तापलेलं असताना NCRB चा धक्कादायक अहवाल समोर आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही सरकारच्या काळात महिलांवर अत्याचार सुरूच आहेत. महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असातना ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.या आकेडवारीनुसार महाविकास आघाडीच्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची सरासरी दर दिवशी १२६ इतकी होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात दर दिवशी सरासरी महिला अत्याचाराच्या १२६ घटना घडत होत्या. विशेष म्हणजे कोव्हिड काळात सर्वत्र निर्बंध असताना देखील महिलांवर होणारे अत्याचार कमी झालेले नाहीत, असं या आकडेवारीतून समोर आलं आहे. बदलापूर प्रकरणावरून राजकारण तापलेलं असताना NCRB चा हा अहवाल समोर आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार कमी झाले नसल्याचं या अहवालातून समोर आलं आहे.