रत्नागिरी शहरालगतच्या चंपक मैदान येथे तरूणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणीतरूणीच्या वैद्यकीय अहवालानंतर ठरणार तपासाची दिशा

. रत्नागिरी शहरालगतच्या चंपक मैदान येथे तरूणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी फॉरेन्सिक लॅबला तरूणीचे नमुने पाठवण्यात आले आहेत. संवेदनशील घटना असल्याने तरूणीचा वैद्यकीय अहवाल लवकरात लवकर मिळावा, अशी विनंती प्रयोगशाळेकडे करण्यात आली आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांना तपासाची योग्य दिशा मिळू शकेल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक योग्य दिशा मिळू शकेल असे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.कुलकर्णी यांनी सांगितले की, तरूणीचा मोबाईल पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला आहे. तरूणीच्या मोबाईलवरील कॉल व मेसेजेस देखील तपासले जाणार आहेत. या घटनेचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे. महिला पोलीस अधिकारी यांच्याकडे गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच याबाबत अधिक माहिती उघड होईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.अलिकडे राज्यभरात घडलेल्या घटनांसंदर्भात कुलकर्णी म्हणाले की, रत्नागिरी शहर हे सुरक्षित आहे. कुणालाही घाबरण्याचे कारण नाही. पोलिसांचे दामिनी पथक तसेच इतर पोलीस अंमलदार अधिकारी रात्रीची गस्त घालत असतात. नागरिकांनी संयम दाखवून पोलिसांना तपासासाठी वेळ देणे आवश्यक आहे. शहरातील ५७ सीसीटीव्ही कॅमेर्‍यांपैकी ३१ कॅमेरे चालू स्थितीत आहेत. तर उर्वरित हे विविध खोदकामामुळे बंद आहेत. ज्या ठेकेदारांकडे हे काम दिले आहे त्याने ३ वर्षे देखरेख ठेवायची आहे असे असतानाही निष्काळजीपणा केल्यामुळे ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे असे कुलकर्णी यांनी सांगितले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button