
राजकीय नेत्यांनी लावलेले बॅनर व झेंडे चिपळूण नगर परिषदेकडून जप्त.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख अजित पवार या दोन नेत्यांच्या येथे लागोपाठ झालेल्या सभांमुळे शहर कमान्या, बॅनर व झेंड्यांनी झळाळून गेले आहे. मात्र ते लावण्यासाठी दिलेली मुदत संपल्याने मंगळवारपासून नगर परिषदेने जप्तीची कारवाई सुरु केली आहे.काही दिवसांपूर्वी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरातील पूर्वीच्या चौपाटीवर अजित पवार तर सोमवारी नगर परिषदेच्या बहाद्दूरशेख नाका येथील सावरकर मैदानावर शरद पवार यांची जाहीर सभा झाली. पूर्वीच्या एकाच पक्षाचे व सध्याच्या दोन भाग झालेल्या पक्षाचे हे प्रमुख आपल्या पक्षांच्या विधानसभेच्या भावी उमेदवारांच्या प्रचारासाठी येथे येत असल्याने गेल्या काही दिवसांपासून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते.www.konkantoday.com