
इको सेन्सेटिव्ह झोनमधून वेरळ गाव वगळण्याची मागणी.
पश्चिम घाटातील निसर्गसंपदेचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रशासनातर्फे पश्चिम घाटातील क्षेत्र पर्यावरण संवेदनशील (इको सेन्सेटिव्ह झोन) म्हणून जाहीर केले आहे. त्यात लांजा तालुक्यातील ५० गावांचा समावेश आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या क्षेत्राबाबत शासनाने हरकती मागवल्या असून दीड महिन्यात तालुक्यातून एकमेव हरकत दाखल झाली आहे. वेरळ ग्रामपंचायतीने ही हरकत महसूल प्रशासनाकडे नोंदवली आहे. इकोसेन्सेटिव्हमधून वेरळ गावाला वगळा, अशी मागणी होत आहे.www.konkantoday.com