रस्त्यामधील खड्डे न बुजविल्यास शिवसेना नगर परिषदेला घेराव घालणार -शहरप्रमुख शशिकांत मोदी
चिपळूण नगर परिषदेने गणपती सण डोळ्यासमोर ठेवून कोणतीही कामे अद्याप सुरू न केल्याने त्याची आठवण करून देण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी नगरपरिषदेवर धडकले. बांधकाम विभागाची संथ गतीने सुरू असलेल्या कामाचा शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी पाढा वचला. बांधकाम विभागाच्या संथ कामामुळे गणेश घाटाकडे जाणारे रस्ते खड्डेमय झालेले आहेत. रस्त्यातील खड्डे बुजवावेत, विसर्जन घाटाच्या भोवतालची स्वच्छता, जंतुनाशक फवारणी, गणेश घाटावर विद्युत व्यवस्था त्वरित करावी, चिपळूण शहरात गॅसपाईपमुळे पडलेले खड्डे वर्कऑर्डर देवूनही त्या ठेकेदाराने खड्डे न बुजविल्यामुळे नागरिकांना त्याचा होणारा त्रास याचा पाढा शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी स्पष्ट शब्दात मांडला. यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता श्री. खताळ यांच्या विरूद्ध शिवसैनिकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. www.konkantoday.com