
रोड सेफ्टी बिल आल्यास एस.टी. महामंडळ तोट्यात जाणार-एस.टी. कामगार संघटनेचा आरोप
केंद्र शासनाकडून लवकरच रोड सेफ्टी बिल कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. हा कायदा महाराष्ट्रात लागू झाला तर एस.टी. स्टँडच्या आवारात खाजगी बसेसही उभ्या राहणार आहेत. याचा परिणाम एस.टी.च्या गाड्यांवर होणार आहे. असे झाले तर आधीच तोट्यात असलेला एस.टी. विभाग आणखीन तोट्यात जाणार आहे. या बिलाची अंमलबजावणी होवू नये म्हणून परिवहन मंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती एस.टी. कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली आहे. शासनाकडून कामगारविरोधी परिपत्रके काढली जात असल्याने एस.टी. कामगारांचे नुकसान होत आहे.
www.konkantoday.com