
रायपाटण येथील ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्यांनी तत्परता दाखविल्याने स्त्री रूग्णाचे बंद पडलेले हृदय झाले सुरू.
राजापूर तालुक्याच्याा पूर्व परिसरातील रायपाटण येथील ग्रामीण रूग्णालयात शुक्रवारी एक अनोखी घटना घडली. हृदय बंद पडलेल्या पाचल मधील ४५ वर्षीय महिलेला तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. रायपाटण ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचारीवर्गाने तत्काळ उपचारांना सुरूवात केली. हृदय प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यासाठी सीपीआर प्रक्रिया सुरू झाली आणि काही क्षणात त्या महिलेच्या बंद पडलेल्या हृदयाची प्रक्रिया पूर्ववत सुरू होवून तिला जीवदान मिळाले.
शुक्रवारी रात्री पाचलमधील वहिदा प्रभूलकर या ४५ वर्षीय अत्यवस्थ महिलेला रायपाटण ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिची स्थिती अत्यंत नाजूक बनली होती. तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी तिच्या हृदयाची स्पंदने जवळजवळ बंद झाली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुर्यकुमार पंदेरीकर आणि रूग्णालयात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचार्यांनी प्रसंग ओळखून तात्काळ उपचाारांना सुरूवात केली.www.konkantoday.com