
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी जिल्हा नियोजनमध्ये निधीची तरतूद करण्याची मागणी
रत्नागिरीतील २ हजार ३८९ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी जिल्हा नियोजनमध्ये निधीची तरतूद करावी, अशी मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दोन दिवसात प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. सध्या अवघ्या जिल्ह्यातील १९ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.बदलापूर घटनेनंतर सर्व शाळांमध्ये तातडीने सीसीटीव्ही बसण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले आहेत. शालेय सुरक्षा चांगली करण्यासाठी उपाययोजना करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. खासगी शाळांमध्ये तर एक महिन्याच्या आत शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश जारी केले आहेत