
चौदाव्या सांस्कृतिक राष्ट्रीय नृत्य स्पर्धा ‘नृत्यअनुभूती’मधे ‘नृत्यार्पणच्या नृत्यांगनांचे यश
रत्नागिरी : अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ नागपूर यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय नृत्य कौन्सिल पॅरिस फ्रान्स यांच्याशी संलग्न असणाऱ्या अखिल नटराजम अंतर सांस्कृतिक संघ नागपूर यांच्यावतीने अखिल भारतीय चौदाव्या सांस्कृतिक राष्ट्रीय नृत्य स्पर्धा नृत्यअनुभूती याचे आयोजन मुंबई येथे केले होते. यामध्ये रत्नागिरीच्या नृत्यार्पण नृत्य अकॅडमीच्या संचालिका सौ. प्रणाली सिद्धेश धुळप (तोडणकर) यांच्यासह अकॅडमीच्या नृत्यांगनानी घवघवीत यश मिळवले आहे. ‘नृत्य अनुभूती’ ही स्पर्धा 21 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट या कालावधीत पाटकर हॉल ऑडिटोरियम, एसएनडीटी कॉलेज, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रणाली धुळप (तोडणकर) यांना नृत्यविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. तर नृत्य प्रशिक्षक म्हणून नृत्याविष्कार पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय या स्पर्धेत त्यांच्या नृत्यार्पण नृत्य अकॅडमीच्या नृत्यांगनानी सुद्धा उत्तम यश प्राप्त केले आहे. लहान वयोगटात अनन्या डांगे प्रथम तर ओवी साळवी तृतीय क्रमांकाने विजयी झाली. ज्युनियर कॅटेगिरी मध्ये प्रथम तीर्था वैद्य, द्वितीय ओजस्वी बामणे, मनस्वी भाटकर, शुभ्रा आंब्रे तर तृतीय क्रमांकाने ज्ञानदा नातू तर चौथ्या क्रमांकाचे मिहिरा कांबळे यांनी पुरस्कार मिळवले. मोठ्या गटात बेस्ट परफॉर्मन्स ऑफ सीजन या पुरस्कारासह स्वरदा लोवलेकर यांनी प्रथम तर वैदेही आंब्रे यांनी तृतीय क्रमांक मिळवला तर खुल्या गटामध्ये स्नेहल नागले द्वितीय, प्रज्वला चवंडे, श्रुती शिंदे आणि केतकी मराठे तृतीय आणि श्रुती किल्लेकर हिने चौथा पुरस्कार क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला आहे. नृत्यार्पण नृत्य अकॅडमीच्या या यशस्वी नृत्यांगनांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.