खासगी आस्थापनांनी महास्वयंम वेबपोर्टलच्या माध्यमातून रोजगार मेळावा आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण भरती मेळाव्यात सहभागी व्हावे

रत्नागिरी, दि.३०-(जिमाका): जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टिने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण भरती मेळाव्याचे आयोजन ३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता, फिनोलेक्स अॕकॅडमी, ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, एम.आय.डी.सी. मिरजोळे रोड येथे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांना/उद्योजकांनी आपल्याकडे उपलब्ध असलेली रिक्त पदे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसूचित करुन जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी.* जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी/उद्योजकांना देण्यात आलेला युझर आयडी व पासवर्ड चा वापर करुन रिक्तपदे ऑनलाईन अधिसूचित करावी व प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करुन रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कृपया जिल्हा कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडे त्वरीत संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन इनुजा शेख, सहायक आयुक्त, कौशल्य विकास यांनी केले आहे. अधिक माहिती करिता या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२१४७८/२९९३८५/९०७५६०२२८३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button