
रघुवीर घाटातील दरड दहा दिवसांनी हटवली
रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणार्या तालुक्यातील रघुवीर घाटात सहा ते सात ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे कंदाटी खोर्यातील १६ गावांचा संपर्क गेल्या दहा दिवसांपासून तुटला होता. रविवारी या घाटातील दरड हटवून अर्धा रस्ता मोकळा करण्यात आला आहे.
एका बाजूला कोयना धरणाचा विराट जलाशय तर दुसरीकडे रघुवीर घाटात कोसळलेली दरड, यामुळे या १६ गावांत कोणाला वैद्यकीय मदतीची गरज भासली तर ती पोहचवण्याची मोठी अडचण निर्माण झाली होती.
www.konkantoday.com