लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी आयोजित बुद्धिबळ स्पर्धा दिमाखात संपन्न एकूण १९८ खेळाडूंचा सहभाग : सावर्डेकर, रायकर, टीपुगडे आणि मांगले विविध गटात विजयी.

* लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी यांनी 25 ऑगस्ट रोजी बांदल हायस्कूल चिपळूण येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चिपळूणच्या ओंकार सावर्डेकरने अपराजित राहून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या विजेतेपदासाठी ओंकार, चिपळूणचाच प्रवीण सावर्डेकर आणि रत्नागिरीच्या अवधूत पटवर्धन यांच्यामध्ये समान गुण झाल्याने टाय ब्रेकर आधारे निकाल जाहीर करण्यात आला. सरस बुकोलझ गुणांच्या आधारे ओंकार प्रथम तर प्रवीण द्वितीय आणि अवधूत ला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी यांच्यामार्फत सन्माननीय एम जे एफ अनिल देसाई पीएमसीसी यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे तसेच आकर्षक चषक व मेडल्स देऊन गौरविण्यात आले. या व्यतिरिक्त बिलाल इलेक्ट्रॉनिक्स यांच्यातर्फे गिफ्ट व्हाउचर आणि रिमझ हॉटेल तर्फे देखील गिफ्ट व्हाउचर खुल्या व महिला गटातील विजेत्यांना अनुक्रमे देण्यात आले.स्पर्धेचे उद्घाटन संगमेश्वर चिपळूण मतदार संघाचे लाडके आमदार माननीय शेखरजी निकम यांच्या शुभहस्ते पटावर चाल करून करण्यात आले. श्री निकम यांनी खेळाडूंशी संवाद साधताना बुद्धिबळ खेळाचा आपल्या दैनंदिन जिवनात होणारा उपयोग याविषयी अमूल्य मार्गदर्शन केले व उपस्थिततांची वाहवा मिळवली. याप्रसंगी स्पर्धा प्रमुख ला. डॉक्टर शमीना परकार, ला. अक्षदा रेळेकर, ला. डॉ. सविता दाभाडे, ला. स्वाती देवळेकर, ला. पद्मा ओली आणि ला. चेतना होमकर उपस्थित होत्या.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चिपळूणचे आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळपटू व प्रशिक्षक प्रविण सावर्डेकर, प्रशिक्षिका सौ. रश्मी सावर्डेकर, कु. ओंकार सावर्डेकर यांनी विशेष परिश्रम घेतले व शालेय गटात सहाय्यक पंच म्हणूनही काम पाहीले. स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच व राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक विवेक सोहनी, रत्नागिरी यांनी काम पाहीले.स्पर्धा खुलागट, महिला गट, पहिली ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा चार गटांमध्ये खेळण्यात आली. साखळी पद्धतीने खेळविल्या गेलेल्या या स्पर्धेत सर्व गटांमध्ये सहा फेऱ्या घेण्यात आल्या. अवघ्या दहा वर्षाच्या विहंग सावंत याने तसेच बारा वर्षाच्या आयुष रायकर याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पहिली ते सातवीच्या गटामध्ये विजेतेपद उपविजेतेपद पटकावत उपस्थित खेळाडू पालक व प्रशिक्षकांची कौतुकाची थाप मिळवली. सई प्रभूदेसाई, निधी मुळ्ये, रमा कानविंदे आणि सानवी दामले यांनी महिला गट सोडून तुलनेने अधिक कठीण असलेल्या खुल्या गटात खेळत आपला कस पणाला लावून उत्कृष्ठ कामगिरी केली. शेवटच्या फेरी अखेर आलेला गटनिहाय विस्तृत निकाल खालील प्रमाणे:🔹 *खुला गट*प्रथम: सावर्डेकर ओंकार, द्वितीय: सावर्डेकर प्रविण, तिसरा ते दहावा क्रमांक : पटवर्धन अवधूत, शिरगावकर तनिश, नारकर साहस, आंबेकर विशाल, ओली किरण, नारकर श्रीहास, नरवणकर मिलिंद, कडू वेद🔸 *महिला गट:*प्रथम: मांगले सुमेधा, द्वितीय: वैद्य पद्मश्री, तिसरा ते दहावा क्रमांक : सावंत अर्णवी, पटेल धर्मी, मालू निधी, दांडेकर तनुष्का, विश्वकर्मा खुशबू, गांधी आर्या, गांधी अस्मी, विश्वकर्मा अनुष्का🔹 *पहिली ते सातवी गट*प्रथम: रायकर आयुष, द्वितीय: सावंत विहंग, तिसरा ते दहावा क्रमांक : पाध्ये राघव, दामले सनवी, दांडेकर सारंग, फडके विपुल, अभ्यंकर सोहम, चौगले झायान, कांबळे श्री, कानविंदे रमा🔸 *आठवी ते दहावी*प्रथम: टिपुगडे चिन्मय, द्वितीय: धुळप आर्यन, तिसरा ते दहावा क्रमांक : चव्हाण अर्णव, दामले सर्वेश, बेर्डे सुतेज, सावंत विपिन, कुलकर्णी ओम, भिंगे हर्षवर्धन, पाटणकर साकेत, पावसकर लवेश

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button