त्यांनी स्वतःच्या वडिलांचा पुतळा देखील सरकारच्या पैशाने उभारला – नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ऐन पावसाळ्यात खराब हवामान असल्यामुळे कोसळला. हा पुतळा ज्यांनी बांधला त्यांनी केलेल्या कामाची चौकशी व्हावी. त्यासोबतच पुतळा कशामुळे कोसळला याची चौकशी करावी. त्यासोबतच राज्य सरकरने हा पुतळा त्वरित उभारावा.पुतळा पडल्याच्या कारणावरून आम्हाला राजकारण करायचे नाही. भाजपवर आरोप करण्याचे कारण विरोधकांना भेटत नाही. त्यामुळे आघाडीचे नेते टीका करीत असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला.बुधवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळला त्याठिकाणाला भेट दिली. या भेटीवेळी राणे समर्थक व ठाकरे समर्थक समोरासमोर आले. त्यामुळे दोन्ही गटात मोठा राडा झाला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांनी विरोधकांवर आरोप केले आहेत.गेल्या काही दिवसात कोणतेच विकास काम विरोधकांनी केले नाही. केवळ कुठल्याही मुद्यावरून राजकारण केले जात आहे. त्यांनी आघाडी सरकारच्या काळात कुठलाच पुतळा उभारला नाही. त्यांनी कसलाच विकास केला नाही. केला असेल तर एखादे काम त्यांनी सांगावे, अशी टीका यावेळी राणे यांनी विरोधकांवर केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्या सरकारवर केवळ आरोप करण्यापलीकडे विरोधकांनी काहीच काम केले नाही. उद्धव ठाकरे यांनी शिवद्रोही असल्याचा आरोप केला आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याबाबत मी काय बोलणार असे म्हणत त्यांनी स्वतःच्या वडिलांचा पुतळा देखील सरकारच्या पैशाने उभारला आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते त्याकाळी कोणातच विकास केला नसल्याचा आरोप राणे यांनी केला.कोकणाचा विकास महायुती सरकारच्या काळात झाला आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर अनेक विकास कामे केली आहेत. त्यामुळे विरोधकांना आमच्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही. दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन विरोधकांनी भाजपने केलेल्या विकास कामावर टीका करू नये, असेही राणे म्हणाले.