गणपतीपुळेनजीकच्या भंडारपुळे भागात मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण समुद्रात बुडाला
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळेनजीकच्या भंडारपुळे भागात मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण समुद्रात बुडाला नौशिन नजीर पेवेकर (३८, रा. मजगाव, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला.नारळी पौर्णिमेनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मधेमधे मोठी सर येत असली तरी पाऊस सरीवरच असल्याने मासेमारी नव्या जोमाने सुरू झाली आहे. मंगळवारी सायंकाळी मजगाव येथील तीनचारजण मासे पकडण्यासाठी म्हणून भंडारपुळे येथे गेले होते. तेथे मासा पकडण्याच्या नादात नौशिन पेवेकर तोल जाऊन पाण्यात पडले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही आणि त्यात नौशिन बुडाले.