ऑनलाईन फसवणुकीचा नवा प्रकार परस्पर पर्सनल लोन मंजूर करून पाच लाख रुपये लांबविले

रत्नागिरी सिद्धीविनायक नगर येथे राहणारे अशोक शांताराम धकाते यांच्या डेबीट कार्डची माहिती घेवून अज्ञात इसमाने परस्पर आयसीआय बँकेत त्यांचे नावे पर्सनल लोन मंजूर करून ते अन्य खात्यात हस्तांतरित करून फिर्यादी धकाते यांची फसवणूक केल्याचा प्रकार रत्नागिरीत घडला आहे.
यातील फिर्यादी अशोक शांताराम धकाते (मूळ रा. नागपूर, सध्या सिद्धीविनायक नगर, शिवाजीनगर) येथे राहतात. त्यांच्या पत्नीला २५ तारखेला सायंकाळी राहुल गुप्ता व शिवकुमार मंजुदेवी या नावाने  फोन करून आपण एमएसईबीच्या पुणे कार्यालयाचा अधिकारी भासवून लाईट बिल न भरल्याने तुमचा विद्युत पुरवठा बंद करण्यात येत असल्याचा खोटा एसएमएस फिर्यादीच्या मोबाईलवर पाठवला. दरम्याने फिर्यादी यांनी एसएमएसबाबत विचारणा करण्यासाठी फोन लावला असता समोरून राहुल गुप्ता असे नाव सांगणार्‍या इसमाने फिर्यादी यांचे लाईट बिलाचे ऑनलाईन सिस्टीमध्ये अपडेट करण्याकरिता प्ले स्टोअरवून त्यांनी सांगितलेले ऍप डावूनलोड व इस्टॉल करण्यास भाग पाडून तसेच फिर्यादी यांचेकडून फिर्यादी यांच्याकडून लबाडीने डेबीट कार्डची माहिती काढून घेतली.
त्यानंतर फिर्यादी यांचे आयसीआयसीआय बँकेमध्ये त्यांच्या नावाने पर्सनल लोन अकाउंट अन्वये पाच लाख रुपये मंजूर करून ते परस्पर ऑनलाईन प्रणालीद्वारे फिर्यादीच्या आयसीआयसीआय बँकेच्या पर्सनल अकाउंटमध्ये जमा केले. त्यानंतर फिर्यादीच्या संमत्तीशिवाय सदरची रक्कम शिवकुमार नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये अनुक्रमे ४,५०,००० व ४९,००० असे ऑनलाईन ट्रान्झेक्शन करून फिर्यादीची फसवणूक केली. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button