रेल्वे ट्रॅकची देखभाल करणारे इंजिन बंद पडल्याने सोमवारी सकाळी कोकण रेल्वेची वाहतूक दोन तासांपेक्षा अधिक काळ विस्कळीत

कोकण रेल्वेच्या सावर्डे ते आरवली दरम्यानच्या मार्गावर रेल्वे ट्रॅकची देखभाल करणारे इंजिन बंद पडल्याने सोमवारी सकाळी रेल्वे वाहतूक दोन तासांपेक्षा अधिक काळ विस्कळीत झाली होती.रेल्वे ट्रॅकची देखभाल करणारे इंजिन बंद पडल्याने गोव्याच्या दिशेने धावणाऱ्या मुंबई सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेससह जनशताब्दी एक्स्प्रेसलाही फटका बसला. सोमवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वंदे भारत एक्स्प्रेससह जनशताब्दी एक्स्प्रेस तसेच मुंबईच्या दिशेने धावणारी कोचुवेली -एलटीटी गरीब रथ एक्स्प्रेस या गाडीसह अन्य काही गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या. मार्गावर बंद पडलेले देखभाल इंजिन सकाळी १०:२४ वाजता बाजूला करण्यात आल्यावर रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक पूर्वपदावर आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button