प्लास्टिक पिशव्यात दगड भरून सांडपाणी लाईन बंद करण्याचा प्रकार
जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या खेडमधील लोटे एमआयडीसीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रासायनिक कारखान्यातून रासायनिक सांडपाणी वाहून नेणार्या सांडपाणी वाहिनीमध्ये व चेंबरमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये दगड व जाणीवपूर्वक अवजड साहित्य टाकून चक्क रासायनिक सांडपाणी वाहिनी बंद करण्याचा व सांडपाणी वाहिनीला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे उघड झाले आहे. याबाबत स्वतः लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राज आंब्रे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. तसेच लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्याकडे याबाबत लेखी स्वरूपात तक्रारदेखील केली आहे.www.konkantoday.com