कट मारल्यामुळे दुचाकी स्वाराचा ताबा सुटून अपघात, जाब विचारायला गेलेल्या दुचाकी स्वाराला रिक्षाचालकाने केली मारहाण व घेतला कानाला चावा


कुवारबाव येथील रस्त्यावर रिक्षाचालकाने दुचाकीला कट मारला. त्यामुळे स्वाराचा ताबा सुटून अपघात झाला. त्याचा जाब विचारणाऱ्या स्वाराला रिक्षा चालकाने दगडाने मारहाण करुन कानाला चावा घेऊन दुखापत केली. शहर पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. लखन चिकोडीकर (रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित रिक्षा चालकाचे नाव आहे. ही घटना २७ मे २०२५ रात्री साडेअकराच्या सुमारास कुवारबाव येथे घडली होती. त्याबाबतचे तक्रार आता दाखल झाली आहे
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सिद्धार्थ मधुकर सुर्वे (वय ३२, रा. कुवारबाव-रत्नागिरी) हे २७ मे रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकी घेऊन रेल्वेस्टेशन नजीक असलेल्या पेट्रोल पंपावर गेले होते. दुचाकीमध्ये पेट्रोल भरुन ते परत घरी जात असताना रत्नागिरीकडे येणाऱ्या रिक्षा चालकाने त्यांना कट मारला. यामुळे सिद्धार्थ यांचा दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकी स्लिप झाली. याबाबत सिद्धार्थ याने रिक्षा चालकाला जाब विचारला असता झालेल्या वादातून लखन याने सिदार्थ याला दगडाने मारहाण केली. तसेच कानाचा चावा घेऊन दुखापत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button