त्यांची नावे जर का मी जाहीर केली तर याना पळताभुई थोडी होईल- उद्योग मंत्री उदय सामंत यांची बाळ मानेवर टीका
उदय सामंत यांनी रत्नागिरीतील मिऱ्या एमआयडीसीवरुन भाजपच्या माजी आमदारांवर टीका केली असून अशा कोल्हे-कुईला घाबरत रत्नागिरी : मिऱ्या येथे अद्याप कोणतीही एमआयडीसी झालेली नाही, पण या विषयाचं काही लोक राजकारण करत आहेत. आमच्या जमिनी घ्या असे सांगायला आलेले लोक कोण आहेत त्यांची नावे जर का मी जाहीर केली तर याना पळताभुई थोडी होईल, पण असं राजकारण मी करत नाही आणि अशा कोल्हे-कुईला मी घाबरत नाही, अशा शब्दात रत्नागिरीचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजपचे माजी आमदार बाळ माने यांना फटकारले आहे.मिऱ्या येथील प्रस्तावित एमआयडीसीवरुन भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून उद्योग मंत्री उदय सांमत यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे, याच विषयावरून उद्योग मंत्र्यांनी टोला लगावला आहे.उदय सामंत पुढे म्हणाले की, मिऱ्या नावाच्या गावामध्ये अजून एमआयडीसी झालेली नाही. फक्त एमआयडीसीचे नोटिफिकेशन काढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. पण काही लोकांचा एवढा गैरसमज झाला की मिऱ्यावर जाऊन उदय सामंतच शंभर एकर जागा घेत आहेत आणि जागा एमआयडीसीला विकायची आहे अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दात उदय सामंत यांनी सुनावलं आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तसंच रिफायनरी बाबतीतही दबावतंत्र वापरून कोणतीही एमआयडीसी होणार नाही, आमचे अधिकारी दबावतंत्र वापरणार नाहीत, हे मला मिऱ्या एमआयडीसी विषयावरून माझी नाहक बदनामी करणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे, ‘एमआयडीसी कोणाला नको असेल, तर मला कोणतीही जबरदस्ती करायची नाही’मिऱ्या येथे जाऊन केवळ आमच्या अधिकाऱ्यांनी सर्वे केला आहे. हे करत असताना तेथील ग्रामस्थ आमच्या अधिकाऱ्यांसह बसले होते. आमचं घरी घेऊ नका, मंदिर घेऊ नका, देवाच्या जागा घेऊ नका असा प्रस्ताव त्यांनी आमच्या समोर ठेवला आणि ते मान्य केल्यानंतर आम्ही नोटिफिकेशन काढलं या जिल्ह्याचा विकास हा पर्यटन उद्योगातून झाला पाहिजे, या माध्यमातून ते उचललेलं पाऊल होतं. पण त्या ठिकाणी एमआयडीसी कोणाला नको असेल तर मला कोणतीही जबरदस्ती करायची नाही www.konkantoday.com