अंगणवाडी सेविकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी सरकार म्हणून आमची:-उदय सामंत
रत्नागिरी दि. २५ ऑगस्ट २०२४ शासनाने सुरु केलेल्या योजना तळागाळातील जनते पर्यत पोचवण्याचे काम ग्राउंड लेव्हलवर ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करतात त्या कर्तृत्वपूर्तीचा सन्मान पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते रत्नागिरी येथे करण्यात आला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण प्रत्येक घरा घरात पोचवण्याचे काम केलात आणि योजना जनते पर्यत पोचवलात त्यासाठी आभार मान्यासाठी आज इथे जमलात त्या बदल तुमचे आभार मानतो. जनतेच्या हिताचे काम करण्याचे योगदान गावागावात अंगणवाडी आणि त्यांचे मदतनीस करत आहेत याचे मीं पालकमंत्री म्हणून कौतूक करतो. अंगणवाडी सेविकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असून सरकार मधली एक जबाबदारी मंत्री म्हणून तुम्हाला शब्द देतो तुमच्या मानधन वाढी प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करेंन.हा राजकीय कार्यक्रम नाही तुम्हाला कोणाला मतदान करायचे आहे त्याला करा मात्र तुमच्या कामाचे कौतूक करण्यासाठी आज इथे बोलवले आहे. आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्याच्या सेवेसाठी काम करत असून २५० लोकांच्या शस्त्रक्रिया उदय सामंत प्रतिष्ठानने करण्याचे काम केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व अंगणवाडी सेविकांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख राहुल पंडित, माजी नगरसेवक राजन शेट्ये, बिपीन बंदरकर, मुसा काझी, सोहेल मुकादम, तहसीलदार राजाराम म्हात्रे, विजय खेडेकर, अंगणवाडी सेविका सायली सावरे, दिपाली केळकर, वृंदा पित्रे, यांच्या सह अनेक अंगणवाडी सेविका उपस्थित होते.