
पिडीत मुलींना वार्यावर सोडणार्या आईसह प्रियकरावर कारवाई होणार?
रत्नागिरी ः आठ वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर या प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कारवाई करण्याच्यादृष्टीने पोलीस यंत्रणेने पावले उचलली आहेत. तीन लहान मुलांना वार्यावर सोडून जाणार्या त्या पिडीत मुलीच्या आईसह तिचा प्रियकर अशा दोघांवर कायदेशीर कारवाई करण्याच्यादृष्टीने तपास सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवाजी स्टेडियममध्ये बालिकेवर एका विकृत मनोवृत्तीच्या इसमाने बलात्कार केला. परंतु यापेक्षाही निर्दयी काम त्या पिडीत मुलीच्या आई आणि आईच्या प्रियकराने केले होते. तीन मुलांची आई असताना तिचे एका तरूणासोबत प्रेमप्रकरण सुरू आहे. प्रेमात मुलांचा अडथळा झाला. तीन मुलांच्या आईसोबत प्रेम केले हे घरी कसे सांगायचे म्हणून त्या तरूणाने आपल्या प्रेयसीच्या तीन मुलांना वार्यावर सोडले.