नेपाळमधील भीषण अपघातात मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातून नेपाळ फिरायला गेलेल्या 104 जणांच्या ग्रूपसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. बसमधून जात असताना अचानत बस 150 मीटर खोल नदीत कोसळली. नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील आयना पहाडा इथे ही दुर्घटना घडली आहे.मर्स्यांगडी नदीत ही बस कोसळली आहे. या दुर्घटनेत ज्याची भीती होती तेच घडलं आहे. मृतांचा आकडा वाढला आहे.मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 27 जणांचे मृतदेह काढण्यात आले आहेत. तर एक जण वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. उर्वरित प्रवाशांना वाचवण्यात यश आलं. बसमध्ये चालक आणि कंडक्टरसह 43 जण प्रवास करत होते. पर्यटक बस पोखराच्या रिसॉर्टमधून काठमांडूच्या दिशेने जात होती. भारतीय दूतावासाने ट्विटरवरील एका पोस्ट लिहून माहिती दिली आहे. पोखराहून काठमांडूला जाणारी भारतीय पर्यटक बस 43 भारतीयांसह 150 मीटर खाली नदीत पडली. बसचा नोंदणी क्रमांक UP 53 FT 7623 होता.या अपघाताबाबत महाराष्ट्र सरकारचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, नेपाळ सहलीला गेलेले सर्व लोक महाराष्ट्रातील भुसावळमधील धरणगाव भागातील रहिवासी होते. ते नेपाळला पर्यटनासाठी गेले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. सर्वजण गोरखपूरहून बसने निघाले होते.पोखराहून काठमांडूसाठी 3 बसेस निघाल्याचे त्यांनी सांगितले. विमानात 104 लोक होते. या तीन बसपैकी एक बस मर्स्यांगडी नदीत पडली. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. गिरीश महाजन म्हणाले की, महाराष्ट्र सरकार संबंधित अधिकारी आणि नेपाळच्या दूतावासाच्या संपर्कात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button