पालकमंत्र्यांच्या हस्ते नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप कार्यक्रम रविवारी
रत्नागिरी, दि. २४ (जिमाका): सहाय्यक कामगार आयुक्त, रत्नागिरी यांचे कार्यालय, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, मुंबई (जिल्हा रत्नागिरी) यांच्यामार्फत रविवार 25 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते रत्नागिरी तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप कार्यक्रम देसाई बॅक्वेट हॉल, विवेक हॉटेल जवळ येथे आयोजित करण्यात आला आहे.*या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित सिंधुरत्न समृध्द योजनेचे सदस्य किरण सामंत तसेच जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.