
संगमेश्वरात सापडली बिबट्याची तीन पिल्ले
संगमेश्वर तालुक्यातील चिखली येथे बंद शेडमध्ये आढळेली बिबट्या जातीची पिल्ले वन विभागाच्या प्रयत्नानंतर जंगलात सुखरूप ठिकाणी पोहोचली.निवृत्त कर्मचारी अशोक महादेव स्वामी व शशिकांत डिंगणकर रविवारी दुपारनंतर काही कामासाठी गेले असता त्यांना ही पिल्ले दिसली. वनविभागाला कळवल्यानंतर विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्यासह वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि या ठिकाणी वनविभागाच्यावतीने कॅमेरे लावण्यात आले.पहिल्या दिवशी बिबट्या मादीने आपल्या तीनपैकी दोन पिल्लांना जंगलात सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे कॅमेर्यातील हालचालीवरून स्पष्ट झाले. तर राहिलेले एक पिल्लू त्या मादीने दुसर्या दिवशी सुरक्षित जंगलात हलविले. यानंतर वनविभागाने सुटकेचा निःश्वास टाकला.विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट, परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी किरण ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल देवरूख तौफिक मुल्ला, वनपाल पाली न्हानू गावडे, वनरक्षक आकाश कडूकर, सहयोग कराडे, अरूणा माळी, पोलीस पाटील रूपेश कदम यांनी सदरची मोहीम पार पाडली.www.konkantoday.com