रत्नागिरी बार असोसिएशनला जिल्हा नियोजनमधून ३० लाख
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी बार असोसिएशनला मंगळवारी भेट दिली. त्यावेळी त्यांनी जिल्हा बार असोसिएशनसाठी जिल्हा नियोजन मंडळातून तीस लाख मंजूर केले असल्याचे सांगितले.यात हॉलचे विस्तारीकरण, ध्वनीक्षेपक, व्यासपीठ, एअर कंडीशनिंग, दोनशे खुर्च्या आदी सोयी उपलब्ध होतील, तसेच रूम नं. ११ हा एसी करण्यात येईल. ग्राहक न्यायालयातील पार्किंग व रस्ता सहकार न्यायालय, एमआरटी यांचे कॅम्प तसेच आयोजित करण्यात लक्ष घालू असे सांगितले. बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पाटणे यांनी सामंत यांचे स्वागत केेले आणि बारच्या विविध मागण्या संदर्भात विस्तृत निवेदन केले. याप्रसंगी ऍड. विजय साखळकर, ऍड. श्रीरंग भावे, ऍड. रत्नदीप चाचले, ऍड. अनिरूद्ध फणसेकर हजर होते. www.konkantoday.com