राज्यात सर्व दूर पावसाची शक्यता! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी!!
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता या आठवड्यात सक्रिय होईल. राज्यातील काही भागांत पुढील २ दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर २४ जूनपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.*दरम्यान, या आठवड्यात कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. पुढील ७ दिवसांत कोकण, गोव्यात जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भात २५ ऑगस्ट रोजी, कोकण आणि गोव्यात २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान तसेच मध्य महाराष्ट्रात २५ ते २६ ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.*’या’ जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता*पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, ओरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर येथे आज आणि पुढील २ दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर ठाणे, रायगड, नाशिक, सातारा येथे आज जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर या ठिकाणी २४ ऑगस्टपासून जोरदार पाऊस बरसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.*कोकण, विदर्भातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट*रायगडला २४ आणि २५ ऑगस्टला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यासाठी २५ ऑगस्टला ऑरेंज अलर्ट राहील.*मुंबईत हलका ते मध्यम पावसाची शक्यता*पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ हवामान आणि हलका ते मध्यम मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३ अंश सेल्सियस आणि २६ अंश सेल्सियसच्या आसपास असेल.*’या’ राज्यांत अतिवृष्टीचा इशारा*उत्तर बांगला देशावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये पुढील २ दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत केरळमधील काही भागांत मुसळधार आणि लक्षद्वीपमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाचे क्षेत्र उत्तर बांगला देश आणि आसपासच्या भागावर सक्रिय आहे. ही प्रणाली पुढील ४८ तासांत पश्चिम बंगालच्या जवळपास पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे.(i) Low Pressure Area over north Bangladesh likely to cause isolated very heavy to extremely heavy rainfall over Assam & Meghalaya and Tripura during next 2 days. pic.twitter.com/0ErJj9EjjE— India Meteorological Department (@Indiametdept) August 21, 2024