लायन्स आय हॉस्पिटलच्या विस्तारित प्रकल्पाबरोबरच अन्य प्रकल्पांसाठी निधी संकलनासाठी लायन आर्ट ऍण्ड म्युझिक फेस्टचे आयोजन.

लायन्स आय हॉस्पिटलच्या विस्तारित प्रकल्पाबरोबरच अन्य प्रकल्पांसाठी निधी संकलनासाठी लायन आर्ट ऍण्ड म्युझिक फेस्टचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लायन्स क्लबबाबत माहिती देताना डॉ. बेडेकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेचे  WE SERVE  हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेऊनच सेवाकार्ये करीत असतो. जगभरात २१० देशात कार्यरत असलेल्या लायन्स संघटने मध्ये १४ लाख पेक्षाही अधिक लायन्स सदस्य कार्यरत आहेत.

१९७३ साली स्थापना झालेला कोकणातील पहिला लायन्स क्लब म्हणजे लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी ! गेली ५२ वर्षे अविरतपणे लायन सदस्य, रत्नागिरी आणि सभोवतालच्या परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवीत आहेत. आपल्या सर्वांना परिचित असलेल्या नेत्ररुग्णालयाची स्थापना सन २००५ साली झाली. लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचा नेत्र रूग्णालय हा कायम स्वरूपी प्रकल्प आहे. येथे २००५-०६ मध्ये ११ ते १५ शस्त्रक्रिया होत होत्या आणि आज २०२४ – २५ मध्ये आम्ही वर्षाला ३००० ते ३५०० पर्यंत शस्त्रक्रिया करत आहोत. त्यापैकी जवळ जवळ ६० ते ६५ टक्के शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. आमच्या १९ वर्षाच्या वाटचालीत सुमारे ५०,००० मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्या. त्याचबरोबर २० एस टी प्रवासी शेड, रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाणपोई, पाळणाघर, डायबेटीस डिटेक्शन ढ सेंटर, श्रवण व वाचा दोष उपचारकेंद्र असे विविध कायमस्वरूपी सेवा प्रकल्प आम्ही राबवीत आहोत. लवकरच महिला आणि मुलांसाठी कायदाविषयक मोफत सल्लाकेंद्र आम्ही सुरू करीत आहोत.

अर्थात हे सर्व सेवा उपक्रम राबविताना आर्थिक पाठबळाची नेहमीच आवश्यकता असते. हे आवश्यक आर्थिक पाठबळ रत्नागिरीकरांनी आम्हाला नेहमीच दिलेले आहे.डायलेसिस सेंटरकिडनी फेल्युअर चे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशा रुग्णांना डायलिसिस करणे किंवा किडनी प्रत्यारोपण करणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. बहुतांश रुग्णांना किडनी प्रत्यारोपण करणे शक्य होत नाही व परवडणारे नसते. त्यामुळे हिमोडायलिसिस करणे हाच पर्याय राहतो. ज्या गरीब रूग्णांना आठवडयातून दोन, तीन वेळा डायलिसिस करणे आवश्यक असते ते अर्थिक अडचणी मुळे आठवडयातून एकदाच डायलिसिस उपचार करतात. अशा रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रत्नागिरीतील सुविधा अपु-या आहेत. त्यामुळेच लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरीटेबल ट्रस्ट ने ही सुविधा लायन्स च्या माध्यमातुन देण्याचे नक्की केले.

अत्यंत किफायतशीर दरात ही सुविधा देण्यात येत फेब्रुवारी २०२४ मध्ये डायलेसिस सेंटर ची सुरूवात झाली असून आतापर्यंत अत्यल्प दरात डायलेसिस सुविधा देण्यात येत होती. थोड्याच कालावधीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मान्यता मिळाल्यावर ही सुविधा पूर्ण पणे मोफत दिली जाणार आहे. परंतु वाढीव रूग्ण संख्या आणि डायलेसिस ची गरज पहाता लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्ट ने डायलेसिस ची सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतला असून डिसेंबर २०२४ पासून याचा लाभ रत्नागिरीमधील रूग्ण घेऊ लागले आहेत. एका रुग्णाची आठवडयाला दोन डायलिसीस मोफत करण्यात येत असून पुढील डायलेसिस साठी अत्यल्प शुल्क आकारण्यात येत आहे. या सर्व सुविधा आणि उपचार गरजुंना मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी निधी उभारण्याची आवश्यकता आहे, यासाठीच लायन्स क्लबच्या माध्यमातून निधी संकलन कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.गेली वीस वर्ष लायन्स आय हॉस्पिटलच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात मोतीबिंदू निवारण साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात येत आहेत.

ग्रामीण भागात शिबीरे आयोजित करुन तेथे सापडलेल्या मोतीबिंदू रुग्णांवर लायन्स आय हॉस्पिटल रत्नागिरी येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात. मात्र सध्याच्या रुग्णालयाची जागा अपुरी पडू लागल्यामुळे लगतच्या प्लॉट मध्ये विस्तारित प्रकल्पाच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. आय हॉस्पिटलच्या विस्तारित प्रकल्पाबरोबरच समाजातील गरजा लक्षात घेत लायन्स ब्लड बँक प्रकल्पही या इमारतीत सुरु करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी घेण्यात येणा-या विविध निधीसंकलन कार्यक्रमांपैकीच हा एक उपक्रम आहे.

अशा विविध उपक्रमांकरीता ‘लायन्स आर्ट ऍण्ड म्युझिक फेस्ट  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कलाकार आपला कलाविष्कार सादर करणार आहेत. तरी कृपया आपण आर्थिक मदत देऊन या कार्यकमाचे प्रायोजकत्व स्वीकारावे. या मध्ये कार्याक्रमाचे पूर्ण प्रायोजत्कव, सह प्रायोजत्कव, स्वागत कमान, जाहिरातींचे बॅनर इ. प्रकारे आपण आम्हाला मदत करू शकता, असेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी, खजिनदार अमेय वीरकर, पराग पानवलकर, मँगो इव्हेंटचे अभिजित गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button