
बदलापूर प्रकरण घडल्यावर सरकारने सर्व शाळांसाठी पाच नवे नियम तातडीने लागू केले
बदलापूर येथे शाळेच्या स्वच्छतागृहात सफाई कर्मचाऱ्याने दोनच चिमुकल्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण घडल्यावर सरकारने सर्व शाळांसाठी पाच नवे नियम तातडीने लागू केले आहेत.या नियमांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व शिक्षण संस्थांना देण्यात आले आहेत. शाळेतील महिला स्वच्छतागृह नजीक महिला सुरक्षा कर्मचारी नियुक्त करणे, दर महिन्याला विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत आढावा घेणे, महिला पालक आणि शिक्षिका यांची विद्यार्थिनी सुरक्षा समिती स्थापन करणे, शाळांमध्ये स्व सुरक्षा अभियान सुरू करणे आणि शाळेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांच पोलीस पडताळणी करणे, हे नियम राज्यातील सर्व शाळांना लागू होणार आहेत. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हे नियम जाहीर केले आहेत.