चिपळूणमध्ये राहणाऱ्या एका 90 वर्षीय आजीच्या डोळ्यातून चक्क 15 सेंटीमीटरचा जिवंत जंत बाहेर काढण्यास डॉक्टरांना यश

चिपळूणमध्ये राहणाऱ्या एका 90 वर्षीय आजीच्या डोळ्यातून 15 सेंटीमीटरचा जिवंत जंत ( Worm ) काढण्यात लाईफ केअर हॉस्पिटलचे नेत्रतज्ज्ञ व कॉर्निया सर्जन डॉ नदीम खतीब यांना यश आले आहे.नदीम खतीब यांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे आणि उपचारांमुळे वृद्ध महिलेची दृष्टी वाचली आहे. आतापर्यंत विविध आजारांसंबंधित अनेक रुग्ण पाहिले आहेत. परंतु, एक विचित्र प्रकार नुकताच समोर आला आहे. चिपळूणमधील लाईफ केअर हॉस्पिटलचे नेत्रतज्ज्ञ व कॉर्निया सर्जन डॉ. नदीम खतीब यांनी एका महिलेच्या डोळ्यातून चक्क 15 सेंटिमीटरचा जिवंत जंत (अस्कॅरिस लुंब्रिकॉईड्स Ascaris Worms) शस्त्रक्रिया करुन बाहेर काढला आहे.
या वृद्ध महिलेचं तपासणीला येण्यापूर्वी मागील तीन-चार दिवसांपासून त्यांच्या डोळ्याला सूज आणि तीव्र वेदना जाणवत होती. दुखणं वाढल्याने कुटुंबियांनी या महिलेला चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. नेत्रतज्ज्ञ डॉ. नदीम खतीब यांनी दुर्बिणीतून तपासणी केली असता या महिलेच्या उजव्या डोळ्यात मोठा जंत (अस्कॅरिस लुंब्रिकॉईड्स) असल्याचं निदान झालं. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. त्यानुसार डॉ नदीम खतीब यांनी तातडीने शस्त्रक्रिया करुन महिलेच्या डोळ्यातून जिंवत जंत (अस्कॅरिस लुंब्रिकॉईड्स) बाहेर काढला. या शस्त्रक्रियेनंतर महिलेचं दुखणं कायमस्वरुपी दूर झालं आहे.
Www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button