कोल्हापुरात दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या
राज्यात चिमुकल्यांवरील होणारे अत्याचार संपता संपेना… राज्यात प्रत्येक दिवसाला चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहे. बदलापूरनंतर मुंबई,नाशिक, अहमदनगरमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.यानंतर आता कोल्हापुरातही १० वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातील शिये गावातील राम नगर परिसरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापुरात दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अत्याचार पीडित मुलगी बुधवार दुपारपासून बेपत्ता होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. आज गुरुवारी महायुतीचा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात मोठा तणाव निर्माण झालेला आहे. १० वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश करण्यास सुरुवात केली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.