श्री गणेशाच्या आगमनाच्या वेळी रत्नागिरी करना अधिक पाणी मिळण्याची शक्यता

गणेशोत्सव काळात नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेपेक्षा किती अधिक वेळ पाणी पुरवठा करता येईल, याची चाचपणी केली जात आहे. सध्या रत्नागिरी शहरवासियांना दीड तास पाणी पुरवठा होत आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे शीळ धरण ओसंडून वाहत आहे. पावसाळा अंतिम टप्प्यात येईपर्यंत म्हणजेच ऑक्टोबर मध्यापर्यंत हा ओव्हरफ्लो कायम असतो. नवीन नळपाणी योजनेमुळे सध्याच्या पाणी पुरवठ्याचा दाब चांगला आहे. त्यामुळे नळधारकांना वेळेत पुरेसे पाणी मिळत आहे.नवीन नळपाणी योजनेमुळे शहराला २४ तास पाणी पुरवठा करण्याची मागणी अधूनमधून करण्यात येते. परंतु याबाबत कोणतेही नियोजन झालेले नाही. मात्र, गणेशोत्सव काळात काही वेळ अधिकचा पाणी पुरवठा करण्याबाबतचे नियोजन केले जात आहे. येत्या काही दिवसातच अधिकचा कितीवेळ पाणी पुरवठा करता येवू शकेल, याची रत्नागिरी न.प. च्या पाणीपुरवठा विभागाकडून चाचपणी केली जात आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button