प्रो कबड्डीत धामणवणेच्या अजिंक्य पवारवर कोटींची बोली
प्रो कबड्डी २०२४ लीगसाठी नुकतीच खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. खेड तालुक्यातील धामणवणे गावचा सुपुत्र अजिंक्य पवार या कबड्डीपटूवर बेंगलूर बुल्स संघाने अखेर १.१० कोटींची बोली लावून त्याचा आपल्या संघात समावेश करून घेतला आहे. त्यामुळे अजिंक्य पवार कोट्यवधी झाला आहे. अजिंक्य पवार प्रो कबड्डी लीगमध्ये येण्यापूर्वी महिंद्रा आणि महिंद्रा संघाकडून खेळत होता. www.konkantoday.com