मालकांच्या परवानगीशिवाय रोडरोलरची विक्री केल्याने गुन्हा

मालकाची परवानगी न घेता परस्पर रोडरोलरची विक्री केल्याप्रकरणी शहर पोलिसांत संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुराद उर्फ पिंटू अल्लमगीर हवालदार (रा. कोल्हापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. रोडरोलर मालकाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार पोसिंानी ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या मालकीचा रोडरोलर (एमएच ०८/२२५४०) हा मुरादा याने भाड्याने कोल्हापूर येथे नेला होता. १५ सप्टेंबर २०२१ ते १६ ऑगस्ट २०२४ या काळात रोडरोलर वापरल्याचे भाडे मुराद याने तक्रारदार यांना दिले नाही. तसेच तक्रारदार यांची परवानगी न घेता मुराद याने रोडरोलरची विक्री केली, अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी मुराद याच्याविरूद्ध भारतीय न्यायसंहिता कायदा कलम ३१६ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button