
हरकती घेतल्याने चिपळुणातील ६,४०६ जणांची घरपट्टी होणार कमी.
चिपळूण येथील घरपट्टी वाढीच्या नगर परिषदेकडून देण्यात आलेल्या नोटीसा, त्यानंतर संबंधितांनी व्यक्त केलेली नाराजी, राजकारण्यांनी या विरोधात उठवलेला आवाज, यानंतर घेण्यात आलेल्या हरकती व त्यावर झालेल्या सुनावण्यांचा येथील ६,४०६ नागरिकांना फायदा झाला आहे. झोन बदल, बांधकामाची अचूक साल यामुळे घरपट्टी कमी होणार आहे.
मात्र १२,४५८ जणांना आहे, तेवढाच कर भरावा लागणार आहे.दोन वर्षापूर्वी नगर परिषदेने एका एजन्सीच्या माध्यमातून शहरातील ३१,७७३ मालमत्तांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम, झोन बदल, यापूर्वी मालमत्ता कर यादीत नाव नसणे, भाड्याने देणे या कारणांमुळे १८ हजार ८६४ मालमत्तांच्या करात वाढ झाली आहे.www.konkantoday.com