नवनिर्मिती फाउंडेशन उक्षी न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेड बु. चा अभिनव उपक्रम संगमेश्वर पोलिसांना राखी बांधून केला रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेडच्या या उपक्रमाचे पोलिसांनी केले स्वागत
महाराष्ट्रभर रक्षाबंधन सारखा पवित्र सण मोठा उत्साहामध्ये बहिण भावाला राखी बांधूनसाजरा करत असताना संगमेश्वर तालुक्यातील नवनिर्मिती फाउंडेशन संचालित न्यू. व्हिजिन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेड बु. येथील विद्यार्थिनींनी संगमेश्वर पोलीस ठाणे येथे जाऊन जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या हाताला राखी बांधून रक्षाबंधनासारखा पवित्र सण मोठ्या आनंदाने आणि उत्साह मध्ये कौटुंबिक रित्या साजरा केला. या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमावेळी संगमेश्वर पोलिस स्थानकातील वातावरण हे भावनिक रित्या ढवळून गेले होते. सीमेवरती लढणाऱ्या जवानांना ज्या पद्धतीने कोणताही सण साजरा करता येत नाही घरापासून आणि कुटुंबापासून दूर राहावे लागते त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्येही जनतेचे 24 तास रक्षण करणाऱ्या पोलिसांना आपले घरदार सोडून कुटुंब सोडून कोणताही सण किंवा उत्सव कुटुंब सहित साजरा न करता जनतेची सेवा करत जनतेच्या रक्षणासाठी ऊन, पावसाळ्याचा विचार न करता रात्र किंवा दिवस न पाहता जनतेची सेवा करणे हेच कर्तव्य समजून काम करणाऱ्या पोलीस बांधवांच्या कृतज्ञतेसाठी आणि त्यांना कौटुंबिक सोहळा मध्ये सहभागी होण्यासाठी हा वेगळा उपक्रम गेली तीन ते चार वर्ष संगमेश्वर पोलीस ठाणे येथे साजरा केला जातो. न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेडच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व पटवून दिले त्यानंतर रक्षाबंधन वरती सुंदर असं गीत पोलिसांसमोर सादर केले. उपस्थित सर्व मान्यवर आणि पोलिसांचे यावेळेस स्वागत ही करण्यात आले. स्वागतानंतर विद्यार्थिनींनी प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला. यावेळी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक श्री. नागरगुजे यांनी शाळेचे कौतुक करत. विद्यार्थ्यांची असणारी शिस्त शिक्षकाने केलेले नियोजन आणि दरवर्षी होत असलेले विविध उपक्रमांना शुभेच्छा देत त्यांचा आदर्श इतर शाळांनी घेणे गरजेचे असल्याचे मत या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमास व्यक्त केले. पोलिसांना सामूहिकरीता कोणत्याही सण साजरा करण्यास मिळत नाही मात्र आजचा हा कौटुंबिक कार्यक्रम पाहता आम्ही कुटुंबात राहून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज संचालक सलाबद्दीन बोट, जमूरत अलजी, तैमूर अलजी,ओंकार वीरकर संगमेश्वर पोलीस स्टेशनचे उप पोलीस निरीक्षक नागरगुजे, श्री शिंदे, सचिन कामेरकर, श्री. जोशीये,श्री. कांबळे, श्री. आव्हाड यांच्या सह सर्व पोलिस बांधव उपस्थित होते.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नाझिमा बांगी, सिमरन मालदार, सुजेन अलजी, नगमा अलजी, अलिशा पाटणकर उपस्थित होते.