…आता औषध उत्पादकांची तपासणी होणार त्रैवार्षिक
औषध उत्पादकांसह विक्रेत्यांची वर्षाला एकदा होणारी तपासणी आता तीन वर्षांनी किंवा जोखमीनुसार करण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने काढली आहे. यानुसार तीन वर्षात एफडीचे अधिकारी फिरकणार नसल्याने औषध उत्पादक यांची तपासणीची भीती आता दूर झाली आहे.अगोदर पाच वर्षाकरिता असलेल्या परवान्याचे नुतनीकरण करण्यासाठी अर्ज भरून द्यावा लागत होता. सोबत इतरही कागदपत्रे जोडावी लागत होती. मात्र नवीन अधिसूचनेत परवान्याची मुदत संपण्यापूर्वी केवळ परवानाशुल्क भरल्यास परवाना पुढे चालू राहील. तसेच अधिसूचनेनुसार शुल्क न भरल्यास पुढील सहा महिन्यात परवाना शुल्कच्या दोन टक्के विलंब शुल्क भरून परवाना चालू ठेवता येणार आहे.www.konkantoday.com