फोटोग्राफर्सनी आधुनिकतेची कास धरावी,- किरण उर्फ भय्या सामंत
मोबाईल क्रांतीमुळे फोटोग्राफीवर खूप वाईट परिणाम झाले. मात्र असे असली तरी देखील फोटोग्राफर्सनी आधुनिकतेची कास धरावी. आधुनिक स्टुडिओ उभारून जनतेला सेवा द्यावी असे आवाहन सिंधूरत्न समृद्ध योजनेचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भैया शेठ सामंत यांनी राजापूर येथे केले. जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त राजापूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये रत्नागिरी जिल्हा आणि राजापूर तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने फोटो फेअर फोटोग्राफर स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किरण उर्फ भैय्या सामंत उपस्थित होते. या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या माजी आमदार ऍड.हुस्नबानू खलिफे, निवासी नायब तहसीलदार सौ दिपाली पंडित, राजापूर अर्बन बँक चेअरमन अनामिका जाधव, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, उपजिल्हाप्रमुख अशपाक हाजू, राजापूरचे माजी नगराध्यक्ष ऍड. जमीर खलीफे, राजापूर फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश खांबल, उपाध्यक्ष सुहास कोंडेकर, सचिव संदेश टिळेकर, खजिनदार चंद्रशेखर माणिक, रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओ ग्राफर असोसिएशनचे संजय शिंदे, कांचन मालगुंडकर, गुरु चौगुले, प्रवीण पाटोळे, सुरेंद्र गीते, विनय गोंधळेकर, श्वेता बेंद्रे, संतोष आग्रे, राजापूर तालुका फोटोग्राफर व्हिडिओ ग्राफर असोसिएशनचे चारुदत्त नाखरे, कलीम मुल्ला, प्रदीप कोळेकर, प्रितेश देवळेकर, महेश पांचाळ, लियाकत सारंग, स्वप्नील पवार, अक्षय सोगम, महेश चव्हाण, पद्माकर आरेकर, अभिजीत पाटील, जयदीप मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.