
कुवारबाव येथील आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण , पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार
नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोहित राजेंद्र चव्हाण (वय-29) आणि पूजा रोहित चव्हाण (वय-28) अशी त्यांची नावे आहेत.
हा प्रकार रत्नागिरीच्या कुवारबाव येथे घडला असून मंगळवारी दुपारी उघडकीस आला आहे. रोहित याला नोकरी नसल्याने त्याने नैराश्येतून हे कृत्य केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव येथे रोहित आणि पूजा हे दांपत्य रहात होते. त्यांना एक लहान मुलगी आहे.
मंगळवारी दुपारी रोहित आणि पूजाचा मृतदेह आढळून आला. पूजाचा मृतदेह बिछान्यावर होता तर रोहितचा मृतदेह ओढणीच्या सहाय्याने पंख्याला लटकत होता. रोहितने पूजाचा खून करुन स्वत: आपले आयुष्य संपवले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. लवकरच याबाबतची माहिती उघड होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com