
रत्नागिरी जिल्हा भाजपमध्ये आलबेल नाही ,जिल्हा उपाध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर यांची जिल्हा उपाध्यक्ष पदावरून उचल बांगडी
विधानसभेच्या निवडणुका जवळ येत चालल्या तस तशा राजकीय उलाढालीला वेग आला आहे पालक मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात मित्रपक्ष असलेला जिल्हा भाजपकडून अंतर्गत विरोध सुरू झाला आहे मात्र खुद्द भाजपमध्ये देखील आता सुरळीत असल्याचे दिसत नाहीरत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर यांना जिल्हा उपाध्यक्ष या पदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली आहे खामकर यांना नेमके कोणत्या कारणास्तव कार्यमुक्त करण्यात आले आहे याचा खुलासा मात्र त्यांनी दिलेला नाही त्यामुळे जिल्हा भाजपमध्ये देखील आलबेल असल्याचे दिसत नाही