
रत्नागिरी जिल्ह्यात डायग्नोस्टिक व्हॅनद्वारे होणार कर्करोग निदान.
सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी आणि कर्करोगाचे निदान सुलभ करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागामार्फत ३० वर्षावरील महिलांसाठी अत्याधुनिक कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन (फिरते रूग्णालय) गावोगावी जाणार आहे. येत्या २६ मे पासून वेळापत्रकाप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कार्यरत होईल. या कामी संबंधित ग्रामपंचायतीनी सहकार्य करावे व या संधीचा मोफत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.या उपक्रमाचा उद्देश रत्नागिरील रहिवाशांपर्यंत विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत महत्वपूर्ण तपासणी सेवा पोहोचवणे हा आहे. यामुळे वेळेवर निदान होईल आणि अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल. ही व्हॅन सामान्य कर्करोगांच्या तपासणीसाठी सुसज्ज आहे. ज्यात सुरूवातीला डिजिटल मशिन वापरून रक्ताच्या तपासण्या आणि कॉल्पोस्कोप वापरून गर्भाशयाच्या मुखाच्या तपासण्या यावर लक्ष केंद्रीत केले जाईल.कर्करोगाविरूद्धच्या लढ्यात लवकर निदान अत्यंत महत्वाचे आहे. मे मिडिऑन हेल्पकेअर यांचेकडून कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन प्राप्त झाली आहे.www.konkantoday.com