
देवमाशाच्या उलटीची विक्री करण्यास परवानगी द्या
समुद्रामध्ये तरंगणारी किंवा किनार्यावर वाहत असलेली देवमाशाची उलटी अर्थात अंबरग्रीसच्या विक्रीस शासनाने अधिकृत परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने राज्य शासनाकडे केली आहे. राज्याच्या मत्स्य धोरणांतर्गत अंबरग्रीस विक्रीस मान्यता देण्यात यावी, असे समितीने सरकारला सुचविले आहे.महाराष्ट्रात मत्स्योद्योग विकास धोरण समिती माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. या समितीने मच्छिमार संघटनांकडे नव्या विकास धोरणासही सूचना, हरकती, सुधारणा, अभिप्राय मागविले आहेत. त्यानुसार पालघर येथे महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची नुकतीच बैठक झाली. यावेळी त्यांनी आपला १५ पानी अहवाल तयार करून तो समितीला लेखी स्वरूपात सादर केला आहे. स्पर्म व्हेल प्रजातीतील मादीने उलटी केल्यानंतर ती समुद्रावर तरंगते अथवा समुद्रकिनारी लागते. मात्र विक्रीच्या उद्देशाने स्थानिकांकडे ती आढळल्यास त्याला गुन्हेगार ठरविले जाते. सदर बाब शिकार अथवा निगडीत घटकांशी अजिबात संबंध येत नाही. तसेच या उलटीचा कोणताही दुरूपयोग होत नाही. उच्च दर्जाची सुगंधीत द्रव्ये बनविण्यासाठी अलटीचाा उपयोग होतो. उलटी रोज मिळत नाही तर वर्षभरातून एखादी उलटी मिळते. ती एक प्रकारे सामान्य मच्छिमारांना लॉटरी असते. त्यामुळे व्हेल माशाची उलटी अधिकृतपणे विकण्याची बाब धोरणात समाविष्ट करावी, अशी सूचना महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीकडून करण्यात आली आहे. www.konkantoday.com