
दादा इदातेंच्या कार्याला मानाचा मुजरा, माजी केंद्रीय मंत्री राम नाईक
जन्मापासून हालअपेष्टा सोसल्यावर व शिक्षण पूर्ण झाल्यावर सुखासीन आयुष्य सहज शक्य असताना समाजातील विषमतानाहीशी व्हावी, सामाजिक समरसता निर्माण व्हावी यासाठी आजही पद्मश्री दादा इदाते कष्टांचे डोंगर उपसताना दिसतात. तेव्हा वयाने मोठा असूनही मला त्यांना मानाचा मुजरा करावासा वाटतो. असे उदगार उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी दापोली येथे काढले.पद्मश्री दादा इदाते यांच्या अमृत महात्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी व विविध पुरस्कारांच्या वितरणासाठी ते दापोलीत आले होते. दापोली तालुक्यातील जालगाव येथील श्रीशैल सभागृहात हा सोहळा पार पडला.यावेळी राष्ट्रसंत डॉ. ह.भ.प. भगवान बाबा आनंदगडकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीराम इदाते, वंदना इदाते, प्रसाद मांडवकर, वैशाली इदाते, राजेंद्र चव्हाण, केदार साठे, सचिन डोंगरकर, संतोष धोपट, विकास लिंगावळे, संदेश मोरे, संपदा पारकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.www.konkantoday.com