
रत्नागिरी जिल्ह्यात वाळूचा साठा उपलब्ध असताना देखील व्यावसायिकांकडून अल्प प्रतिसाद
जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या वाळू उपसा प्रक्रियेत जिल्हा प्रशासनाला मोठा संघर्ष करावा लागत आहे. खाड्यांमधून डेजरने वाळू उपसा कारण्यासाठी प्रशासनाने तब्बल पाचवेळा निविदा प्रक्रिया राबवली, पण त्याला व्यावसायिकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. वाळूचे गट उपलब्ध असतानाही अनेक ठेकेदार या लिलयांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा प्रशासनाने एकूण २२ वाळू उपसा गट निश्चित केले होते. यापैकी केवळ पाच गटांचाच लिलाव यशस्वी झाला. तर उर्वरित १६ गटांकडे वाळू व्यावसायिकांनी साफ दुर्लक्ष केल्याचे सांमगण्यात आले. वाळू उत्खननासाठी प्रशासनातर्फे एकूण सहावेळा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. पण २२ संग्रहित पैकी केवळ ६ गटांनीच प्रतिसाद मिळाला आहे. प्रशासनाला या १६ गटांसाठी तब्बल २३ कोटी ८० लाख रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.
www.konkantoday.com




