ठाकरे गटाचे खासदार 9 2 11, पुन्हा ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स लागले
वक्फ बोर्ड अधिनियम 1995′ च्या संशोधनामुळे ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. उद्धव ठाकरे गटाला या विधेयका संदर्भात ठोस भूमिका घ्यावी लागेल. अन्यथा विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसू शकतो.महाराष्ट्रात यावरुन राजकारणही सुरु झालं आहे. मुंबईतील वर्सोवा विधानसभा क्षेत्रात पुन्हा ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स लागले आहेत. मुस्लिम बहुल परिसर असलेल्या भागात मशिदिबाहेर हे बॅनर्स लागले आहेत. बॅनरवर ठाकरेंना वक्फ बोर्डाच्या निर्णयावरून सवाल विचारण्यात आला आहे. मुसलमानांची मतं भरभरून घेतली, पण जेव्हा मुसलमानांच्या हक्कासाठी लढण्याची वेळ आली, वक्फ बोर्डावर बोलण्याची पाळी आली, तेव्हा साहेबांचे 9 खासदार पळून गेले. 9 2 11 झाले… सगळे असा आशय या बॅनरवर आहे. मध्यरात्रीशिवसेनेच्या वर्सोवा विधानसभा कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी झाल्याची प्राथमिक माहिती.